सुसंस्कृत विचारी तरुण हेच देशाची खरी संपत्ती .....

           

          आज भारतात कशाचं वार सुटले आहे कुणास ठाऊक? जो तो येतोय मोठाल्या वास्तू बनवतोय , मूर्ती , स्मारक बनवतोय . आज जिकडे तिकडे बघतोय सगळीकडे हेच . या वास्तू ही स्मारके आपण कशासाठी उभारतोय . तर अनेक जणांचं असे मत आहे की , आपला इतिहास हा टिकून राहावा ,  आजच्या पिढीला तो माहीत व्हावा . पण खरं तर आज आपण ज्या वास्तू निर्माण करतोय त्यामुळे आपला इतिहास टिकत नाहीये उलट तो नष्ट केला जातोय . कारण ह्या देशात शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण ज्यांची स्मारके उभारतोय ज्यांच्या नावाने इथे वास्तू बांधतोय , त्यांचे विचार त्यांचा इतिहास इथे शिकवलाच जात नाहीये . त्यांनी केलेली कार्य काय आहेत हे आणि काही तरुणांना आपल्या देशात जन्मलेल्या महापुरुषांची नावे देखील माहीत नाहीयेत इतकी दरिद्री परिस्थिती आज आपल्या देशाची झालेली आहे आणि म्हणून इतक्या साध्या गोष्टी देखील आपल्या तरुण पिढीला माहित नसतील तर , थोर व्यक्तींचे स्मारक , वास्तू बांधून काय त्यांच्यावर खाक परिणाम होणार आहे . हा पण एक गोष्ट मात्र होणार ती म्हणजे , आपल्या तरुण पिढीला फिरण्यासाठी आणि चित्र - विचित्र गोष्टी करण्यासाठी नवीन पर्यटन स्थळे मात्र प्राप्त होणार . पण चांगले विचार , ते काही ह्या देशातील तरुणांना मिळणार नाही .
          आज आपण जितकी उंच  प्रभूची , महापुरुषांची , युगपुरुषांची स्मारक बांधत आहोत ना! तितक्याच खालच्या पातळीवर इथल्या लोकांची विचार क्षमता चाललेली आहे आणि म्हणूनच इतक्या वाईट गोष्टी आपल्या आजूबाजूला घडताना दिसत आहेत . आज आम्ही धर्माचे रंग लावून हिंडत आहोत पण त्या धर्माची नैतिक मूल्ये मात्र आम्ही स्वीकारायला तयार नाही होत .


आज आम्ही आमचा धर्म महान आहे असे मुद्दामहून छाती ठोकून इतरांना सांगतो पण , धर्म ज्या सुसंस्कृत विचारांमुळे महान आहे ते विचार मात्र आम्ही आत्मसात करण्यासाठी तयार होत नाही . आज लोकं फक्त " संख्या " या गोष्टीवरच खूप विश्वास ठेवू लागली आहे . " जिकडे जास्त गर्दी तो श्रेष्ठ " आणि हे असणारच कारण लोकशाही आहे ना! आपल्या देशात! आणि म्हणून आज प्रत्येक जण एकमेकांशी स्पर्धा करत आहे , स्वतः ला इतरांपेक्षा महान सिद्ध करण्यासाठी झटत आहे .
          आज मी जगात बघतोय , जो तो आपल्या धर्माचा प्रसार व्हावा यासाठी झटत आहे . जो कोणी मिळेल त्याला घाबरवून , समजावून तर कुठे पैसे देऊन आपल्या धर्मात सामील करण्याचा अविचारी प्रयत्न आज या जगात सुरू आहे . कारण काय तर , माझा धर्म महान आहे हे इतरांना सांगण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहे . पण आपण समजावून घेतलं पाहिजे की " महानता ही लोकसंख्येवर आधारीत नसून , ती गुणवत्तेवर ठरते " १०० गोणी बदल्याच्या असण्यापेक्षा ४० गोणी चांगला कांदा असणे कधीही उत्तमचं ,

म्हणून जास्तीच्या मागे पळू नका जे चांगलं आणि योग्य आहे तेच स्वीकारा .
         आज आपल्या देशात इतकी अराजकता माजली आहे की , " शेताच्या बांधा पासून तर , देशाच्या सीमेपर्यंत नुसती भांडणचं भांडण चालू आहे " आज आपण जगतो कमी पण भांडणचं जास्त करतो . सगळीकडे नुसता मानसिक कल्लोळ माजलेला आहे . आज ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला केल्या जातात ना! त्यातील बहुतेक गोष्टी फक्त आणि फक्त दिखाऊपणा साठीचं केल्या जात आहेत . आज जी अनेक ठिकाणी किर्तने , प्रवचने ही होतातच , पण तिही बहुतेक वेळा दिखाऊपणासाठीच . आज लोकं कीर्तनाला , प्रवचनाला जातात
पण कशासाठी तर जेवणासाठी , तर कोणी मान सन्मानासाठी . आज आपला हा देश पूर्णपणे एका दलदलीत फसत चालला आहे . पण आम्ही मात्र देशाला ह्या दलदलीतून बाहेर काढण्याऐवजी देशाला अजून दलदलीच्या आतमध्ये ढकलत आहे .
         आपला हा देश या दलदलीतून बाहेर निघावा असं वाटतं असेल आणि पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर पूर्ण स्वावलंबनावर उभा करायचा असेल ना! तर आपण आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीला , शिक्षणाला , विचारांना पुन्हा जिवंत करायला हवं आणि ह्या भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते पोचवायला हवं . " अरे शिक्षण ते असतं जे व्यक्तीला मानसिक समाधान , मानसिक शांती प्राप्त करून देते , ते नव्हे जे व्यक्तीच्या मनात मानसिक कल्लोळ , असंतुष्टता निर्माण करेल "

आणि म्हणून आज आपण जे शिक्षण घेतोय ना! ते असंच आहे जे व्यक्तीच्या मनामध्ये असंतुष्टता आणि कल्लोळ निर्माण करते आहे . अरे शिक्षण ते असतं ज्यामुळे काय चांगले आणि काय वाईट याचा फरक करण्याची क्षमता निर्माण होते , प्राप्त होते . पण आजच्या शिक्षणामुळे ती क्षमता इथलाच्या तरुणांना प्राप्त होत नाहीये आणि यांमुळेच आज आपल्या आजूबाजूला एवढ्या वाईट आणि चारित्राहिन गोष्टी घडताना दिसत आहे .
          आज आपला देश सुधरावा आणि इथलचे लोकंसुद्धा एकमेकासंगे गुण्यागोविंदाने रहावी त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट भावना , विचार नसावे यासाठी आपण आपल्या देशातील आपल्या प्राचीन सनातनी विचारांना स्वीकारायलाच हवं , ज्यायोगे आपला भारत सुसंस्कृत आणि चांगल्या , स्वाभिमानी विचारांचा बनेल आणि पुन्हा एकदा ह्या जगाचा वैश्विक गुरु बनेल .....

म्हणून स्वीकारा आपल्या प्राचीनतेला कारण " जुन्यातचं आहे खरं सोनं " .....


          ..... वंदे मातरम् ..... जय हिंद ..... जय भारत ..... 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भौतिकवादी नव्हे तर आध्यात्मिकवादी विकास आधी आम्हाला हवा आहे .....