पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

थंड होऊन षंड बनण्यापेक्षा , गरम होऊन राष्ट्रधर्मी होऊया .....

इमेज
                   आज प्रत्येक देश एकमेकांशी प्रत्येक बाबतीत स्पर्धा करत आहे . एकमेकांशी चढाओढ करत आहे . ती आर्थिक बाब असो वा राजकीय . आज जे देश प्रगतीच्या बाबतीत पुढे आहेत , ते उद्या , आज मागासलेल्या असणाऱ्या देशांच्या मागे येणारचं आहे , मग कितीही काही झालं तरी आणि आज जे देश मागे आहेत , ते उद्या , प्रगतीच्या आणि विकासाच्या पथावर पुढे जाणारचं आहेत , हे त्रिकाल सत्य आहे . कारण अधोगतीची , विकासाची परिस्थिती ही त्या देशातील असणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवर अवलंबून असते आणि लोकांची मानसिकता ही एखाद्या ठराविक उच्च पातळी पर्यंत पोहोचली आणि तिला सुख , चैन ह्या गोष्टींची सवय लागली की , ती त्या परिस्थितीची भोगी बनते आणि त्या भौतिक सुखलाचं सर्वश्रेष्ठ मानून बसते त्यामुळे , त्या व्यक्तीचे हळू हळू पतन होत जाते .            ही गोष्ट म्हणजे अशी आहे की , श्रीमंत कुटुंबात जन्माला येणाऱ्या व्यक्तींपैकी , बहुतांश लोकं हे ज्याप्रमाणे त्यांच्या भौतिक परिस्थितीचा वापर हा स्वतःच्या उत्कर्षासाठी करून न घेता , फक्त त्याचा भौतिक...

धर्म - आहे जगण्याचा खरा अर्थ .....

इमेज
          आज बहुतेक लोकांचं असं म्हणणे आहे की , आज समाजात जी काही वाद चाललेले आहे , जी काही अराजकता माजलेली आहे त्याचे मूळ म्हणजे जगात असणाऱ्या " धर्म , जाती " आहेत . त्यामुळे आज अनेक लोकं म्हणतात की , जर समाजातील " धर्म " नष्ट झाला की , सर्व भेदभाव , दंगली नष्ट होतील . त्यामुळेचं आज आपण धर्म नष्ट व्हावा अशीही मागणी करतो , पण ही मागणी , हा विचार मुळातचं चुकीचा आहे . उलटं जेव्हा धर्म नष्ट होईल ना! तेव्हा उलट भांडणे , अत्याचार , गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढतील .          धर्माची स्थापना ही सर्व भेद मिटवून , सर्व भूतलावर एकता पसरवण्यासाठी आणि मनुष्याच्या उत्कर्षासाठी करण्यात आली होती . पण आज धर्माच्या नावाखाली समाजाची पिळवणूक करणाऱ्या काही थोडक्या लोकांमुळे आपण संपूर्ण धर्मालाचं चुकीचे ठरवायला लागलो तर हा समाजाचा कुठले शहाणपण आहे , ही बाब म्हणजे अशी आहे की , उसाच्या फडात कोल्हे शिरले म्हणून संपूर्ण उसाच्या फडालाचं आग लावणे अशी गोष्ट झाली म्हणून  , जरी लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणून काय वाघाचे अस्तित्व झुगारून जमत...

लोकशाही ही लोक सहभागातून तसेच , लोकशाहीवादी देश हा सामाजिकरणांतूनचं टिकतो .....

इमेज
             आज सकाळीचं मी वर्तमानपत्रात बातमी वाचली की , भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन मर्यादित कंपनीचे सरकारच्या ताब्यात असणारे ५२% चे शेअर सरकार लिलावात काढणार आहे . म्हणजेचं कंपनीचे पूर्णपणे खासगीकरण होणार आहे . आज सद्यस्थितीला  आपल्या देशामध्ये तीन ते चार टक्के लोक हे सर्वात श्रीमंत आहेत . आपल्या देशात असणारे सर्व मोठाले व्यवसाय हे याच लोकांच्या ताब्यात आहेत . आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा ५० ते ६०  टक्के भाग याचं भांडवलशाही लोकांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे हे लोक आपल्या जवळील पैशाचा वापर करून सरकार आपल्या पद्धतीने चालवण्याचा बहुतांशी प्रयत्न करतात . आता तुम्हीचं विचार करा जर देशातील सर्व अर्थव्यवस्था ही खाजगी कंपन्यांच्या ताब्यात गेली तर , जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या देशात निवडून येणारे सरकार हे कोणासाठी काम करेल . याचा विचार आता तुम्हीचं करावा . आजमितीला ह्या देशातील लोकांना राजकीय स्वतंत्र तरी आहेत पण ह्या देशात सर्व खासगीकरण झाले ना! तर ह्या देशातील नागरिकांना फक्त गुलामासारखे जगावे लागेलं . तसा आज तो विचारांनी गुलाम झाल...