अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....
ह्या जगातील आपल्या सर्वांना येणारी दुःख ही भौतिक बंधनांमुळे येतात , कारण भौतिक सुखांची , भौतिक आनंदाची आपल्याला प्राप्ती होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या भौतिक गोष्टीच्या आधाराची गरज असते . तो आनंद कोणत्याही स्वरूपाचा असूद्यात . जेव्हा एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो अथवा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून निघून जाते , तेव्हा त्या व्यक्तीला सर्वाधिक दुःख होते जो व्यक्ती मृत्यू झालेल्या अथवा सोडून गेलेल्या व्यक्तीशी कोणत्या ना कोणत्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भौतिक बंधनाद्वारे जोडला गेलेला असतो कारण त्या व्यक्तीचा भौतिक सुखांचा आधार हा पूर्णपणे हरवलेला असतो , म्हणजेच थोडक्यात भौतिक बंधने तुम्हाला ह्या जगतामध्ये अडकवून ठेवण्याची काम करतात . याउलट अध्यात्मिक अंगामध्ये असते ,
ज्या ठिकाणी स्वतःला ह्या जगातून एका योग्य अध्यात्मिक साधनेद्वारे मुक्त करण्याचा सुंदर मार्ग दिलेला असतो .
" अध्यात्मिक जगतातील स्वतःच्या मुक्तीचा मार्ग अर्थात अध्यात्मिक स्वार्थ म्हणजे स्वतःचे सोडून अवघ्या विश्वातील लोकांचे कल्याण करण्यामध्ये लपलेला असतो,तर भौतिक जगतातील भौतिक स्वार्थ हा फक्त आणि फक्त स्वतःचे भौतिक कल्याण करण्यामध्ये केंद्रित झालेला असतो .जो की ,फक्तं आणि फक्तं क्षणिक आनंद प्रधान करतो तर आध्यात्मिक जगतातील अध्यात्मिक स्वार्थ हा चिरशांती प्रधान करतो " .
" भौतिक स्वार्थामुळे जग हे वाळवंटातील त्या झाडासारखे भासते जे की , एकटेचं बहरलेले दिसते परंतु त्यांच्या आजूबाजूला सगळीकडे वाळवंट पसरलेले असते " .
याउलट आध्यात्मिक मार्गात असते जिथे बहरलेल्या वनवाटिकेसारखे सगळीकडे सुख शांती , समाधानी आणि परिपूर्णतेची जाणीव असते ,
जिथे डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यासारखा निस्वार्थीपणाची वृत्ती प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावातून आणि आचरणातून ओसंडून वाहत असेल , अशा सुंदर जगाच्या स्थापनेसाठी प्रत्येक व्यक्तीला अध्यात्मिक शिक्षण देणे खूप गरजेचे आहे . पण आपल्याकडे बऱ्याच वेळेला असं म्हटलं जाते की , उपाशीपोटी अध्यात्माचे , धर्मांचे शिक्षण देऊन काय होणार? पण याआधी तुम्ही या गोष्टीवर विचार करा की , पोट भरण्यासाठीचा योग्य मार्ग कोणता आहे हे सांगणारा अध्यात्मिक धर्मचं तर आहे ना! म्हणून आज जरी तुम्हाला संपूर्ण देशात गरिबी वाटत असली ,
संपूर्ण देशात हातावर पोट भरणाऱ्यांची संख्या अधिक असते तरी देखील देशातील लोकांना अध्यात्मिक धर्माचे शिक्षण हे द्यायलाच पाहिजे कारण की ह्या शिक्षणाशिवाय या देशाचे आणि येणाऱ्या भावी पिढ्यांचे कल्याण होणार नाही .
आपल्या पुराण ग्रंथांमध्ये एक कथा आहे त्या कथेमध्ये एकदा एक भक्त प्रल्हाद महाराजांना एक प्रश्न विचारतो की , मनुष्याच्या जीवनात आध्यात्मिक शिक्षणाची सुरुवात ही कधीपासून व्हायला हवी? , तर या प्रश्नाचे उत्तर देताना प्रल्हाद महाराज म्हणतात की , पाच वर्षे पाच महिन्यांपासून अध्यात्मिक शिक्षणाचा मनुष्य जीवनात पाया भरण्यास प्रारंभ करायला हवा .
कारण घडवलेली मडकी पुन्हा घडवता येतं नाहीत आणि जरी तसा प्रयत्न केला तर त्यातील निम्म्याहून अधिकं मडकी फुटल्याशिवाय राहत नाहीत , त्यामुळे कच्च्या मडक्यांना योग्य आकार दिलेला कधीही चांगलाचं .
म्हणून मूलभूत गरजांची कितीही अपूर्णता असली तरी देखील आध्यात्मिक ज्ञानाच्या शिक्षणाची पूर्तता ही आधी करायलाचं हवी . तेव्हाच हे जगं योग्य आणि कल्याणकारी मार्गावर चालेलं .....
..... वंदे मातरम ..... जय हिंद ..... जय भारत .....





Right correct 99/100 marks ...
उत्तर द्याहटवाYou should visit once Shree Swami Samartha Pradhan Kendra Dindori or nearby Shree Swami Samartha Dindori pranit Kendra.... To experience true scientific Adhyatma ... And to experience what is really important according to you...
Balance must be maintained in between Adhyatmik jivan and Bhautik jivan...
खुप छान
उत्तर द्याहटवा