पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुमचे चांगले विचारचं बदलतील हा देश .....

इमेज
                    आज सकाळी मी एक बातमी वाचली जी की बहुतेकांनी आपल्या मोबाईल स्टेटस ठेवली होती . ती बातमी होती हैदराबाद मधील एका युवतीवर बलात्कार झाल्याची ..... ह्या वाईट गोष्टीचा राग सगळ्यांनी आपल्या स्टेटसमधून पुरा व्यक्त केला . बहुतेकांनी तर शिव्यांपर्यंत मजल मारली . पण हे करताना ते सर्व विसरले की , कुठेतरी आपणही या अशाच प्रकारच्या खराब विचारांचा भाग आहोत भलेही ते कृतीत आणले नसतील ( कारण विचार करणे ही अर्धी कृती असते ) आज बहुतेक तरुण स्रीकडे आकर्षित होतात , त्यांच्या मनामध्ये स्री बघताच विषयं भावना उत्पन्न होतेच होते  , मग आता तुम्हीच सांगा त्यां नराधामांमध्ये आणि आपल्या मध्ये फरक कसा काय? त्या नराधमांचा शिरच्छेद करायला हवा , त्यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी द्यायला हवी , त्यांना जाळून टाकायला हवं असे विचार अनेकांनी मांडले पण ,           " झाडाची खराब झालेली फांदी छाटून काय उपयोग जर का , त्या झाडाची मुळेच विषात बुडालेली असतील . "              त्यांना आज फ...

सुसंस्कृत विचार हीच खरी संपत्ती

इमेज
                    आज आपण आपल्या आजूबाजूला ज्या वाईट घटना , ज्या वाईट गोष्टी बघतोय ह्या कशामुळे होतात , का मनुष्य ह्या वाईट गोष्टींना बळी पडतोय याचं कारण आपण कधी शोधण्याचा प्रयत्न केलाय का? आज आपल्या देशात , आपल्या समाजात बहुतांश लोक फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत आहेत . आजच्या मनुष्याला वाटतंय की मीच सर्वांपेक्षा बलवान व्हावा आणि म्हणून आज बहुतांश लोक स्वार्थी भाव मनात ठेवून कार्य करत असतात . बहुतेक जण आज मीतीला फक्त आणि फक्त दिखाऊपणा करण्यात व्यस्त आहे .           मनुष्याची पहिली प्राथमिक गरज असते अन्न आणि ती पूर्ण झाली की , त्याला संपत्तीची ओढ लागते , संपत्ती मिळाली की दिखाऊपणा वाढतो आणि तो वाढला की समाजामध्ये  मानाचे स्थान मिळावे असे त्याला वाटते आणि त्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी तू तयार असतो . ही आजची  परिस्थिती आहे , ती आज तयार झाली आहे अशातला भाग नाहीये , तर ही परिस्थिती महाभारताच्या काळापासून चालत आलेली आहे आणि सबंध महाभारत देखील स्वार्थीपणा मुळेचं...

स्वकीय भाषा स्वीकारा , आणि स्वतःचे अस्तित्व टिकवा .....

इमेज
                        आज वीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनाचा इतिहास सांगणारा अजय देवगन चा " TANAJI - The Unsung Warrior " या  चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला . आनंद तर खूप झाला कारण आपल्या मायभूमीच्‍या रक्षणासाठी लढणाऱ्या आणि स्वराज्याची स्थापना करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या एका वीराचा इतिहास मोठ्या पडद्यावर आणि जगासमोर येणार आहे , पण त्याच बरोबर दुःखही झालं जे की , आनंदाहूनही अधिक होते  आणि मनाला देखील बोचण्यासारखे आहे . ते म्हणजे  आपल्या प्राणाची आहुती देऊन , स्वराज्याचं आणि आपल्या स्वकीयांच रक्षण करणाऱ्या ह्या वीराच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपटाचे नाव हे इंग्रजीमध्ये , काय तर " TANAJI - The Unsung Warrior " अरे संस्कृती आपली , इतिहास आपला , यशाची शौर्यगाथा आपली पण ती , आपल्या लोकांपुढे मांडायची , विदेशी भाषेचा आधार घेऊन? हे कितपत योग्य आहे , आता सांगा तुम्हीच?          आता ही एक गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या माय मराठीची . हा चित्रपट प्रदर्शित ह...

जसा ससा आणि कासव , तशीच आधुनिकता आणि स्वदेशी

इमेज
                        आज वर्तमानपत्रामध्ये मी एक नवीन बातमी वाचली की ,  कर्करोगासारख्या प्राणघातक रोगावर कायमस्वरूपी उपचार सापडला . पण मला तर यावर असं वाटतंय की ही फक्त आणि फक्त वर्तमानपत्र मधील एक बातमी म्हणूनच राहणार आहे आणि ही गोष्ट लोकांपर्यंत कधीच पोहोचणार नाहीये . कारण आज  कर्करोग हा जगातील सर्वात मोठे व्यापाराचे साधन बनलेला आहे . हे फक्त कर्करोगासाठी नसून तर हजारो बाकीच्या आजारांसाठी देखील आहे . त्यामुळे कायमस्वरूपी त्यावर उपचार म्हणजे लाखो करोडो रुपयांचा व्यापार याठिकाणी नष्ट होणार आणि ते तर ह्या विदेशी व्यापारी कंपन्या होऊ देणार नाही .               ह्या आजारांचा व्यापार आज इतका मोठा झालेला आहे की ,  या व्यापारातली सर्वात खालची कडी  म्हणजे उपचार करणाऱ्या डॉक्टरांची , यांचे देखील आज बंगले उभे राहण्यास सुरुवात झाली आहे . सर्वात खालच्या कडीची एवढं उत्पन्न असेल तर ,  सर्वात वरती असणाऱ्या कंपन्या किती पैसा छापीत असतील याचा आकडा आपल्या विचारांच्या...

व्यसनाधीनता - एक विषारी साप

इमेज
                          आज माझ्या घराच्या शेजारी , माझाच चुलत भाऊ म्हटलं तरी चालेल , दारुच्या आहारी गेल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला , अत्यंत वाईट आणि हृदयद्रावक ही घटना होती . एका पूर्ण कुटुंबाला वाऱ्यावर सोडून तो परमात्म्यात विलीन झाला . तो गेला पण त्याच्या मागे असणार्‍या त्याच्या कुटुंबाचे मात्र हाल काही काळ हाल होणारं . " कुणी कुणासाठी थांबत नाही हे मला मान्य आहे " , पण तरीही एक न भरता येणारी पोकळी मात्र आयुष्यभरासाठी त्यांच्या जीवनात तयार झाली आहे . असे एक-दोन नाही तर , लाखो-करोडो संसार आजपर्यंतच्या ह्या व्यसनापायी उद्ध्वस्त झालेले आहेत , नष्ट झालेले आहेत . अरे ऐन उमेदीच्या म्हणजेच पंचवीस तीस वर्षाच्या वयात या व्यसनामुळे अनेक माणसे आपल्या कुटुंबाला सोडून जातात .                दोन-तीन दिवसांपूर्वी अशीच एक हृदयद्रावक घटना आमच्या गावातच घडली , ती म्हणजे दारूच्या अतिसेवनामुळे फुफ्फुसे फुटून एकाचा दुर्दैवी अंत झाला . अशी आपल्या सभोवताली असंख्य वाईट उदाहरणे असूनही आपण ...

स्वावलंबन आणि स्वदेशी हीच काळाची गरज

इमेज
                              आज मी जेव्हा एखादा विचार , एखादा शब्द लिहिण्यासाठी घेतो तेव्हा तो विचार , तो शब्द लिहिताना माझ्याकडून तो आपोआप इंग्रजी या भाषेमध्ये , इंग्रजी अक्षरामध्ये लिहिला जातो . आपल्या मराठी भाषेत तो शब्द पहिल्यांदा माझ्याकडून लिहिलाच जात नाही . इतक्या मोठ्या प्रमाणावर या विदेशी भाषेने माझ्या मनावर , माझ्या बुद्धीवर ताबा मिळवलेला आहे . आज बोलताना देखील मी अनेक शब्द इंग्रजीच वापरतो . इतकेच नाही तर आजची म्हातारी  माणसे देखील इंग्रजी शब्द वापरतात . आज आपण बोलताना जवळजवळ अर्धे इंग्रजीत बोलतो . आज आपल्या आजूबाजूला अशा अनेक वस्तू आहेत , ज्यांना मराठीतून काय म्हणतात , त्यांच्यासाठी मराठीतून काय शब्द वापरतात हे आपल्याला माहितच नाही . उदाहरण द्यायचं झालं तर , टेबल , मोबाईल , आयडिया ही काही थोडेच शब्द झाले पण यांसारखे असे खूप शब्द आहेत , जे आजमितीला आपण वापरतो . इंग्रजीचे व्याकरण सोडले तर ,  इंग्रजी ही भाषा दररोज आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपण सर्रास पणे वापरतो . आज जेव्हा मी माझ्...

शेती - आणि शेतीचे झालेले विदेशीकरण

इमेज
                      " शेती " हा आपल्या देशाचा एक प्रमुख व्यवसाय आहे , अरे देशाच्या पाठीचा कणाच म्हणा की , पण आज तोच पाठीचा कणा मोडत चाललाय असं वाटतंय , कारण आज शेतीमध्ये कीटकनाशके वापरल्याशिवाय शेती करणे शक्यच नाही . बिना अजैविक खतानं शिवाय शेतीत पिकचं येत नाही . हरितक्रांतीच्या नावाखाली ह्या विषारी खतांची सुरुवात भारतात झाली . अनेक विषारी कीटकनाशके , खते आपण पिके चांगली यावी म्हणून वापरतो , परंतु त्या खतापासून त्या  कीटकनाशकांपासून पीक टुमदार नक्कीच दिसते , पण पिकाची गुणवत्ता पूर्णपणे ढासाळते . ज्याप्रमाणे ड्रग्स ( सर्प पावडर )याच्या सेवनाची , एकदा सेवन केल्यावर शरीराला जशी सवय लागते ना ! तशीच सवय आज आपल्या भूमीला , आपल्या मातीला आणि पिकांना लागलेली आहे . आणि त्यातच आज मितीला कंपनीमधून जे " बी " आपण लागवडीसाठी , पेरणीसाठी घेतो ना! त्या बियांची  पेरणी केल्यावर जे धान्य तयार होते ना! ते पुन्हा तुम्ही पेरणीसाठी वापरले ना! तर ते उतरून येत नाही . इतकी पिकांची कार्यक्षमता फक्त व्यापारापायी ढासळलेली आहे .   ...