पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नागरिकत्व ( एनआरसी आणि कॅब ) कायदा योग्य की अयोग्य ? .....

इमेज
                    आज देशभरामध्ये एनआरसी आणि कॅब या नागरिकत्व कायद्यामुळे जी अराजकता माजलेली आहे . आज जी मोठ्या प्रमाणावर आंदोलन आपल्या देशात चालू आहेत . ह्या चालू असणाऱ्या आंदोलनामधील बऱ्याच लोकांना या कायद्याबद्दल धूसर अशी देखील कल्पना नाहीये . हे लोकं फक्त आणि फक्त आपला समाज , आपल्या आजूबाजूचे लोक आंदोलन करतात म्हणून ते देखील करत आहेत . एका मेंढराच्या कळपाप्रमाणे ही आंदोलने आपल्या देशात आज सुरू आहेत . जी की , जंगलातल्या वनव्याप्रमाणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाढतचं चालली आहे . आंदोलन करणाऱ्यांना माझा विरोध नाहीये पण आधी कायदा काय आहे हे समजून घ्यायला हवं  आणि मग आंदोलन करायला हवे .            आपल्या देशात अशीही अनेक लोकं आहेत जी की , फक्त आणि फक्त दुसऱ्या समाजाविषयी , दुसऱ्या धर्माविषयी मनामध्ये असणाऱ्या विरोधी भावनेमुळे ह्या कायद्याला पाठिंबा किंवा विरोध करत आहेत . त्यांनीही संप्रदायाच्या दृष्टीने विचार न करता भारतीय म्हणून विचार करायला हवा           या का...

स्वदेशीचा स्वीकार हाचं खरा देशाचा विकास .....

इमेज
                                       आज जेव्हा आपण अमेरिकेचा अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येते की , अमेरिकेचे क्षेत्रफळ हे ९८ लाख ३४ हजार चौरस किलोमीटर आहे आणि अमेरिकेची लोकसंख्या ३२ कोटी . आता भारताचा विचार करूयात , भारताची लोकसंख्या १३६ कोटी आणि क्षेत्रफळ ३२ लाख ३७ हजार चौरस किलोमीटर . याचाचं अर्थ अमेरिकेत लोकसंख्या कमी आणि जमिनीचे क्षेत्र जास्त ,   पण भारतात मात्र याउलट परिस्थिती आहे पण एवढं असूनही अमेरिका बराचं शेतीमाल हा आयातच करते आणि भारत निर्यात . ( ही स्थिती फक्त अमेरिकेबाबतची आहे , असे नसून , ही अनेक प्रगतशील देशांना देखील लागू पडते .) आता जर इथे विचार केला तर , निर्यात करणारे देश हे जास्त विकसीत असायला हवेत , पण तसे आहे का? तर नाही , आणि का नाही? याचं कारण म्हणजे आपण जी आज पिकं घेतोय , ती जरी आज आपण आपल्या भूमीत घेत असलो , तरी ती पिकवण्यासाठी , ती टिकवण्यासाठी औषधे मात्र दुसऱ्याचं देशांची वापरतोय . भारतातील वातावरण खूप चांगल्या प्रकारचे आहे ...

व्हा खरे ज्ञानी ..... व्हा सत्यवादी आणि निःस्वार्थी .....

इमेज
          आज मनुष्याच्या जीवनात जे काही घडत आहे , जे काही गोष्टी होत आहेत , ते सर्वकाही अतिप्रमाणात होत आहे . ती कोणतीसुद्धा गोष्ट असो . कारण आज मनुष्याचा स्वार्थ खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे . ज्या चांगल्या गोष्टी आज मनुष्य करत आहे ना! यात देखील बहुतेकदा स्वार्थीपणा असतोच . " इकडे आड तिकडे विहीर " या म्हणीप्रमाणे आज मनुष्याची जीवन अवस्था होताना दिसत आहे . कोणत्या दिशेला जावं हा प्रश्न आज अनेकांच्या मनामध्ये निर्माण होताना दिसतोय .          आज मनुष्य त्याच्या रोजच्या जीवनात छोट छोटाली  पापे नकळतपणे करतच असतो आणि ही आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे , तर कधी आधार नसलेले दावेही निर्माण करतो आणि त्यायोगे आपल्या मनाची समजूत काढतो आणि आपल्या वाईट गोष्टींची पाठराखणी देखील करतो . " थेंबे थेंबे तळे साचे " ही म्हण आपल्याला माहीतच आहे पण हीच म्हण आपल्याला छोटी-छोटी पापे करताना ध्यानात येत नाही , ही आपली आजची दुर्दैवी स्थिती आहे .           प्रत्येक वेळेला मनुष्यापुढे वाईट आणि चांगले असे दोन पर्याय असतात . पण द...

विविधतेमध्येच आहे खरी एकता .....

इमेज
          विविधता हा प्रत्येकाच्या जीवनाचा खूप महत्त्वाचा विषय आहे . आज मीतिला अनेक वाईट गोष्टी घडत आहेत आणि या सर्व वाईट गोष्टींचे कारण " विविधता " आहे असे अनेकांचे म्हणणे आहे . आज अनेक जण विचार करतात की , धर्म , पंथ , भाषा , राज्य हे सर्व नष्ट झाले तर , सर्व लोकांमध्ये एकता येईल , सर्व जण गुण्यागोविंदाने राहतील आणि फक्त माणुसकी हाच धर्म ह्या जगात उरेल , पण खरंतर हे आहे , जर ही विविधता , हे धर्म , भाषा , प्रांत , पंत नष्ट झाले ना! तर जगण्याची ओढ , जगण्यातील उत्सुकता आणि मजाही नष्ट होईल आणि हे जगणं कंटाळवाणे होऊन विद्रूप होईल .  एकता जर आणायची असेल तर , विविधता नष्ट करण्याची गरज नाहीये , फक्त आणि फक्त तुमचे विचार बदलणे महत्वाचे आहे . जर तुमचे विचार सुसंस्कृत आणि चांगले असतील तर , सर्वांमध्ये " एकता " नक्कीच येईल . आज तुम्ही या समाजात , या जगात जी अराजकता माजलेली आहे , जी असंतुष्टता निर्माण झालेली आहे , ती पाहत आहात ना! ती अराजकता , ती असंतुष्टता , ही " विविधता " नष्ट केली  तरी , नष्ट होणार नाहीये . अरे ही " विविधता " नष्ट करण्याची बाब म्हणजे ...

सुसंस्कृत विचारी तरुण हेच देशाची खरी संपत्ती .....

इमेज
                      आज भारतात कशाचं वार सुटले आहे कुणास ठाऊक? जो तो येतोय मोठाल्या वास्तू बनवतोय , मूर्ती , स्मारक बनवतोय . आज जिकडे तिकडे बघतोय सगळीकडे हेच . या वास्तू ही स्मारके आपण कशासाठी उभारतोय . तर अनेक जणांचं असे मत आहे की , आपला इतिहास हा टिकून राहावा ,  आजच्या पिढीला तो माहीत व्हावा . पण खरं तर आज आपण ज्या वास्तू निर्माण करतोय त्यामुळे आपला इतिहास टिकत नाहीये उलट तो नष्ट केला जातोय . कारण ह्या देशात शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण ज्यांची स्मारके उभारतोय ज्यांच्या नावाने इथे वास्तू बांधतोय , त्यांचे विचार त्यांचा इतिहास इथे शिकवलाच जात नाहीये . त्यांनी केलेली कार्य काय आहेत हे आणि काही तरुणांना आपल्या देशात जन्मलेल्या महापुरुषांची नावे देखील माहीत नाहीयेत इतकी दरिद्री परिस्थिती आज आपल्या देशाची झालेली आहे आणि म्हणून इतक्या साध्या गोष्टी देखील आपल्या तरुण पिढीला माहित नसतील तर , थोर व्यक्तींचे स्मारक , वास्तू बांधून काय त्यांच्यावर खाक परिणाम होणार आहे . हा पण एक गोष्ट मात्र होणार ती म्हणजे , आपल्या तरुण पिढीला फिरण्य...

चांगले विचारी व्हा , दिखाऊबाज नको .....

इमेज
                    आज सकाळी हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचे एनकाउंटर झाल्याची बातमी आली आणि बातमीमुळे सगळ्यांनीच आनंद साजरा केला . काहींनी ढोल-ताशे वाजवले , फटाके फोडले , पेढे वाटले सर्व लोकांना न्याय मिळाल्याचा आनंद झाला आणि आत्तापर्यंत जे जे बलात्कार झालेले आहेत त्यातील आरोपींना देखील लवकरच किंबहुना अशाचं प्रकारची शिक्षा मिळावी म्हणून सर्वांनी मागणी केली . ती मागणी रास्त ही आहे . पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे आज ह्या गुन्ह्याची फाईल इथेच बंद झाली आणि आपलं कामही इथेच संपले . आता आपण उद्यापासून सगळेजण या सर्व घटना विसरून पुन्हा आपापल्या कामाला लागणार , पुन्हा आपली रोजची कामे , रोजच्या सवयी प्रमाणे जगण्यास सुरुवात करणार .                        काय गेले आहे घडून ,                        याचा नाही बोध घेत माणसाचे मन ,                     ...

आज विचार बदलला तरच उद्या जगशाल .....

इमेज
          किती वाईट परिस्थिती आजमितीला आपल्या संपूर्ण मानव जातीवर आपण ओढवलेली आहे याची कणमात्रही कल्पना आपल्याला नाहीये . आज सद्यस्थितीला कोणी माणुसकीचा विचारच करताना दिसत नाहीये . जो तो आज दिखाऊपणा करण्यात व्यस्त आहे .                     प्रत्येक जण आज आपल्या धर्माला स्वतःहाच्या प्राणापेक्षा प्रिय मानतो आहे आणि ते मानायलाच हवं . पण त्याचबरोबर आपल्या धर्म आपल्याला काय सांगतो? , धर्माचे खरे विचार काय? याची देखील आपल्याला तितकीच जाणीव असली पाहिजे . आजच्या युगातील माणसाचा स्वभाव असा झाला आहे की , तो कोणत्याही गोष्टीवर विचार न करता ती बरोबर आहे का चूक आहे हे न जाणता , ती गोष्ट स्वीकारत आहे आणि आपल्या विचारशून्य प्रवृत्तीमुळे आपण चांगल्या गोष्टीला वाईट आणि वाईट गोष्टीला चांगले मानतं चाललो आहे .           आज बहुतेक लोकांमध्ये धर्माचे खरे विचार जिवंत नाहीये . कारण आज बहुतेक माणसांचा पैसा हाच धर्म होऊन बसला आहे . पहिल्या काळात तुम्ही धर्माला मानत आहात आणि धर्माचे खरे मानवतावादी निस्वार्थ...